
नाशिक, दि. २३ (जिमाका ): माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ अभियानांतर्गत माडसांगवी येथील ‘विघ्नहर्ता फ्रेंड सर्कल’ गणेशोत्सव मंडळास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी परेश पाटील आणि नवनाथ पालवे यांनी नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम तसेच जनहिताच्या योजनांची माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रियेबाबत माहिती करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांचा सहभाग याबाबतही जनजागृती करण्यात आली.
‘लोकसंवाद’ अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवून शासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा जिल्हा माहिती कार्यालयाचा प्रयत्न आहे. गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून हा संवाद अधिक व्यापक करण्यासाठी विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी माडसांगवीच्या सरपंच कल्पना खरात, उपसरपंच अनिल पेखळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप गोडसे, मंडळाचे अध्यक्ष प्रशिक सोळसे, उपाध्यक्ष शुभम कडाळे तसेच शरद पेकळे, गोपाल बर्वे, शांताराम दाते, अरुण खरात आदी उपस्थित होते.
00000

Leave a Reply