थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

दापोलीत २७ ते २९ सप्टेंबर विशेष सेवा शिबिर; विमुक्त जाती व भटक्या जमातींना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

दापोलीत २७ ते २९ सप्टेंबर विशेष सेवा शिबिर; विमुक्त जाती व भटक्या जमातींना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

रत्नागिरी, दि. २४ (जिमाका): राज्य शासनाच्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या (VJNT) कल्याणासाठी दापोली तालुक्यात २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी सलग तीन दिवस विशेष सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली शहरातील ‘ओम साईराम मित्र मंडळा’च्या सार्वजनिक गणेशोत्सवात जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे आयोजित लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांनी ही माहिती दिली.

या लोकसंवाद कार्यक्रमाला तहसीलदार कार्यालयाचे अव्वल कारकून बाळा कराड, मंडळाचे अध्यक्ष निलेश (बावा) केळसकर,  पत्रकार प्रसाद रानडे आणि शिवाजी गोरे उपस्थित होते.

शिबिरांचे ठिकाण व वेळ

हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पुढील तीन ठिकाणी आयोजित केले जाईल:

२७ सप्टेंबर: ग्रामपंचायत कार्यालय, वाकवली

२८ सप्टेंबर: परमपूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय (पालगड तिठा), पालगड

२९ सप्टेंबर: ग्रामपंचायत कार्यालय, दाभोळ

मिळणाऱ्या प्रमुख सेवा व सुविधा

शिबिरस्थळी महसूल आणि इतर संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना खालील सेवा पुरवतील:

दाखले व प्रमाणपत्रे: जात, उत्पन्न, रहिवासी, अधिवास (डोमासाइल), नॉन-क्रिमिलेअर, विवाह नोंदणी तसेच जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रे.

ओळख व कल्याणकारी कार्ड्स: नवमतदार नोंदणी, शिधापत्रिका (रेशन कार्ड), आधार कार्ड दुरुस्ती/नोंदणी सेवा, आयुष्यमान भारत कार्ड, ॲग्रीस्टॅक व फार्मर आयडी.

शासकीय योजनांचा लाभ: श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना.

दाभोळ येथील विशेष सुविधा: दाभोळ येथील शिबिरात मत्स्यव्यवसाय विभागाकडून फिशरीज कार्ड आणि ‘पीएम मत्स्य संपदा’ योजनेंतर्गत कर्ज योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगत विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केले. योजनांचा लाभ मिळण्यात अडचण आल्यास स्थानिक तलाठी अथवा ग्रामसेवकांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साईराम मित्र मंडळाचे सेक्रेटरी बाळा पवार, निखिल परब, स्वप्निल जोशी, प्रथमेश दुर्गावळे, भाऊ वेल्हाळ, तेजस घाणेकर, सानिका पवार आणि अर्चना शिगवण यांनी विशेष परिश्रम घेतले.

000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *