थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

शेतात गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करा; कृषी विभागाचे आवाहन

शेतात गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करा; कृषी विभागाचे आवाहन

सातारा, दि. 25 : शेती पिकांचे मोठे नुकसान करणाऱ्या गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर योग्य उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. गोगलगायी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी किंवा सूर्योदयापूर्वी जास्त सक्रिय असतात. त्यामुळे या काळात शेतात आढळणाऱ्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात बुडवून नष्ट करावीत.

या किडीला एकत्र गोळा करण्यासाठी शेतापासून ७ ते ८ मीटर अंतरावर बांधावर गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषांचे ढीग लावावेत आणि त्यावर गुळाचे पाणी फवारावे. सकाळी या ढिगाखाली गोगलगाय व त्यांची अंडी आढळून येतात, ती मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकून नष्ट करावीत. पाऊस नसेल तर शेताच्या बांधापासून साधारण ५ सेंटीमीटर अंतरावर चुन्याच्या भुकटीचा थर धुरळल्यास बांधावरील गोगलगायी शेतात येण्यापूर्वीच चुन्याच्या संपर्कात येऊन नष्ट होतात. तसेच निरुपयोगी गोणपाट २.५ टक्के गुळाच्या द्रावणात किंवा १५ टक्के मिठाच्या द्रावणात बुडवून प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति एकर १० गोणपाट याप्रमाणे अंथरून ठेवल्यास गोगलगायी त्याकडे आकर्षित होऊन त्यांचा सहजरित्या नाश करता येतो. भाजीपाला पिकांमध्ये प्रादुर्भाव आढळल्यास मेटालडिहाईड २.५ टक्के प्रति एकर २ किलो याप्रमाणे धुरळणी करावी.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *