थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी सैनिकांसाठी प्रादेशिक सेनेचा भरती मेळावा

शेतात गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करा; कृषी विभागाचे आवाहन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

धुळे, दि. २९ सप्टेंबर, २०२६: राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत माजी सैनिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ५० वर्षांखालील पात्र माजी सैनिकांसाठी प्रादेशिक सेनेचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १३६ पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) इको, महार यांच्या वतीने प्रादेशिक सेनेच्या पर्यावरणीय बटालियनमध्ये सेवेसाठी अखिल भारतीय स्तरावर पात्र माजी सैनिकांची नावनोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील (निवृत्त) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ही भरती प्रक्रिया ५ ते ८ ऑक्टोबर,२०२६ या कालावधीत दररोज सकाळी ५ वाजेपासून राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ६ चे मैदान, महिंदळे शिवार, साक्री रोड, धुळे येथे होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या शेप-१ पात्रता असलेले तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी चारित्र्य श्रेणी उत्कृष्ट किंवा अतिशय चांगली असलेले इच्छुक माजी सैनिक पात्र राहतील.

इच्छुक उमेदवारांनी निवृत्तीवेतन आदेशाची मूळ प्रत, सेवामुक्ती पुस्तिका, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराची १० छायाचित्रे तसेच आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत घेऊन नियोजित वेळेत भरतीस्थळी उपस्थित राहावे.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून माजी सैनिकांना उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ मिळावा, यासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी या भरती मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.