थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, ३० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

माझगाव डॉकमधील फिक्स-टर्म कामगारांच्या हिताचे रक्षण करणार – उपसभापती सचिन अहिर

माझगाव डॉकमधील फिक्स-टर्म कामगारांच्या हिताचे रक्षण करणार – उपसभापती सचिन अहिर

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. ३० : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधील सुमारे ३,००० फिक्स्ड-टर्म (मुदतबद्ध) कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार राहू देणार नाही, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या या अनुभवी कामगारांना ‘ब्रेक’ न देता पुन्हा कामावर घेणे, त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी धोरण आखणे, बेसिक वेतनातील तफावत दूर करून विशेष वेतनवाढ देणे आणि अमर्यादित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, या प्रमुख मागण्यांबाबत उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे कामगार राज्यमंत्री, आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

कामगारांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत उपसभापती सचिन अहिर यांनी माझगाव डॉक व्यवस्थापनाला तातडीने सूचना दिल्या. कामगारांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात आणि उपलब्ध रिक्त पदांवर अनुभवी फिक्स्ड-टर्म कामगारांना प्राधान्य देण्याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि संबंधित वरिष्ठ पातळीवर तात्काळ सकारात्मक पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी व्यवस्थापनाला दिले. केंद्रीय स्तरावर सर्व पक्षीय खासदारही यासंदर्भात भूमिका मांडत असल्याचे उपसभापती अहिर यांनी सांगितले.

000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.