थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दुष्काळी स्थितीची पाहणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली दुष्काळी स्थितीची पाहणी

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

छत्रपती संभाजीनगर, दि.२ (जिमाका) – दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शेकटा मंडळात पिकांच्या अवस्थेची पाहणी केली. त्यांचे समवेत आमदार अनुराधा चव्हाण, आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकटेश राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

   शेकटा मंडळातील गाढे जळगाव येथील गट नंबर ३७६ येथील मजूर उस्मान खान पठाण या शेतकऱ्याच्या शेतात श्री. बावनकुळे यांनी पाहणी केली. शेतातील सोयाबीन या पिकाची दुरावस्था झाली असून पाण्याअभावी पूर्ण पीक करपून गेले आहे. श्री. बावनकुळे म्हणाले की, शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून संपूर्ण यंत्रणा आता पंचनामे करीत आहे. अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांना अधिक मोबदला कसा देता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठीही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे श्री. बावनकुळे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.