थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली माहिती

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली माहिती

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

हिंगोली, दि. ३ : हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली असून, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले. त्यापूर्वी औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात सकाळी ७.४६ वाजता भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला. या धक्क्याची नोंद ३.३ रिश्टर स्केल इतकी झाली.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी पाहणी व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.