थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून भेट

गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून भेट

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

हिंगोली, दि. १७ (जिमाका): औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील कमलाबाई सोपान कांदे (वय ६०) यांच्या आत्महत्येनंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

कमलाबाई कांदे यांच्या नावे स्वतंत्र शेतजमीन नसून शेती त्यांच्या पती सोपान विठोबा कांदे यांच्या नावे आहे. गोजेगाव येथील गट क्रमांक २२/२ (वर्ग-२) ही जमीन सामाईक खात्यावर असून त्यामध्ये सोपान विठोबा कांदे, दत्ता विठोबा कांदे व उद्धव विठोबा कांदे यांचा समावेश आहे.

कमलाबाई कांदे यांच्या पश्चात पती सोपान विठोबा कांदे, मुलगा विष्णू सोपान कांदे व सून असा परिवार आहे. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.