थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत

पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत

हिंगोली, दि. १७: वनहक्काच्या दाव्यांना गती देत मंजूर वनपट्टेधारकांना हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियानात’विविध सेवा देण्यात येणार आहेत. यासोबत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत सातबारा ई-नमुना व वनहक्क अभिलेख पट्टा प्रदान प्रमाणपत्र आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत पाच वनपट्टेधारकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पांडुरंग हनवता रिठे (लोहगाव), महादू राघोजी कांबळे (लोहगाव), साहेबराव किसन बेले (खेडी), दादाराव लिबाजी बेले (खेडी) यांचा समावेश असून पाचव्या लाभार्थ्याच्या गावाची नोंद जांभुरून आंध अशी करण्यात आली आहे. विशेष मोहिमेमुळे वनपट्टेधारकांना त्यांच्या हक्काच्या जमिनीशी संबंधित अभिलेख व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *