थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

देवळा येथे ‘आरोग्य अभियान-२०२६’ व ‘लोकसंवाद’ अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी

देवळा येथे ‘आरोग्य अभियान-२०२६’ व ‘लोकसंवाद’ अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी

नाशिक, दि. १८: देवळा येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिरात नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळीच निदान व उपचार करून घ्यावेत, तसेच शासनाच्या उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, सुभाष रोड गणेश मित्र मंडळ, देवळा, ग्रामीण रुग्णालय, देवळा, उपकेंद्र, देवळा-१, ‘आपला दवाखाना’, इंदिरानगर आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री गणेशा आरोग्याचा-आरोग्य अभियान २०२६’ अंतर्गत सुभाष रोड, देवळा येथील गणेश मंडळाच्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिरास देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप बच्छाव, देवळा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगीराज निकम, ‘आपला दवाखाना’चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधूत आहेर, उपसंपादक प्रवीण बावा यांच्यासह समुपदेशक शिवाजी गांजे, अधिपरिचारिका प्रतिभा आहेर, आरोग्य सेवक विक्रम कुंडगिरी, सुरेश खताले, मयूर गुंजाळ, योगेश बहिरम, रोहित वाघ, आशा सेविका विजया पाटील, मनिषा बच्छाव, चित्रा वाणी, तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

विविध आरोग्य तपासण्यांसह मार्गदर्शन

या शिबिरात नागरिकांची उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, मधुमेह, डोळे, मौखिक आरोग्य तसेच ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना व उपलब्ध आरोग्य सुविधांची माहितीही देण्यात आली.

नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे प्राथमिक अवस्थेत निदान होऊन वेळेत उपचार घेणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी आणि पात्रतेनुसार शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यावतीने गणेशोत्सव कालावधीत ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम व नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाबाबत उपसंपादक प्रवीण बावा यांनी सविस्तर माहिती दिली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली असून, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासही मदत होत आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन निरोगी जीवनशैलीसाठी नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *