थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली पिकस्थितीची पाहणी

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली पिकस्थितीची पाहणी

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

छत्रपती संभाजीनगर, दि. २०: सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पिकस्थितीची पाहणी केली. आ. रमेश बोरनारे हे त्यांच्या समवेत होते.

पालकमंत्री शिरसाट यांनी आज मौजे जांबरगाव ता. वैजापूर येथे टंचाईच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यांचे समवेत तहसिलदार सुनिल सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी तसेच स्थानिक अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी उपस्थित शेतकऱ्यांशीही संवाद साधला. लोकांची मते जाणून घेतली. पिकांची स्थिती पाहून पालकमंत्री शिरसाट यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.