थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, २० सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि. २०: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकसंवाद उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरातील श्री. सिद्धिविनायक बाल गणेश मंडळ येथे लोकसंवाद व सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हिंगोली नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी पंडीत मस्के यांनी गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या लोकसंवाद व ‘सेवा संकल्प’ अभियान कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वनिधी ते समृद्धी, दिव्यांग कल्याणकारी योजना, एकल महिला सर्वेक्षण-२०२६, रमाई आवास योजना, बचतगट स्थापना व त्यांचे संवर्धन यासह विविध महिलांना देण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश आहे.

शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी संबंधित योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह हिंगोली नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार कल्याण देशमुख, नगरपरिषदेचे अधिकारी, विजय रामेश्वर, श्री. नरवाडे, श्री. चव्हाण, स्वच्छता महिला कर्मचारी विविध मान्यवर, महिला, बालके तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसंवादाच्या माध्यमातून शासकीय योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *