थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमास तुंगमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमास तुंगमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली, दि. २१: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने आयोजित लोकसंवाद उपक्रमाला तुंग येथील शिवक्रांती मित्र मंडळ येथे उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी केलेल्या विनंतीनुसार या उपक्रमास उपसरपंच विलास डांगे, मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी त्यांच्या मंडळाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या मंचावर कौशल्य विकास विभागाचे संतोष फासे, बार्टीच्या संयोगिता हेरकळ, कोतवाल सुधीर गोंधळी यांनी त्यांच्या विभागाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.

कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या २९ सप्टेंबरला राज्यात एक हजार ठिकाणी रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात येत असून, या अंतर्गत सांगली जिल्ह्यात १६ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी क्यू आर कोडची माहिती तसेच पूर्वतयारी, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आदींची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. फासे यांनी केले.

सेवा हाच संकल्प उपक्रमांतर्गत कोतवाल सुधीर गोंधळी यांनी महसुल विभागाच्या योजना, दाखले, पाणंदमुक्त रस्ते योजना आदींची माहिती दिली.

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजना, गटई स्टॉल, वसतिगृहे, स्वाधार योजना, विविध महामंडळे यांच्या योजना, जात पडताळणी याबाबतची माहिती संयोगिता हेरकळ यांनी दिली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमासाठी सांगलीच्या अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) इनुजा शेख, सहायक आयुक्त( समाजकल्याण) बाळासाहेब कामत, बार्टीचे गणेश सवाखंडे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास भर पावसातही मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, महिला, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे शंका निरसनही करण्यात आले.राज्यभरात १६ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान ‘लोकसंवाद-२०२६’ हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिका व रोजगार महाकुंभचा क्यू आर कोड मंडळास देण्यात आला.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *