थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, २३ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार

मुंबई, दि. २२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार झाला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथेही ताज हॉटेल साकारत असल्यामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

कोकणच्या निसर्गसौंदर्याला जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे व रोहन रानडे उपस्थित होते.

०००००

मनिषा सावळे/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *