केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घेतले गणेशदर्शन – smartmaharashtra.in थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

  


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घेतले गणेशदर्शन


दुवा कॉपी केला!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी घेतले गणेशदर्शन

मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक गणपतीची आरती केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या पत्नीचे ‘वर्षा’ येथे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार अमित साटम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

000

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government


maharashtrasmart@gmail.com
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart@gmail.com

maharashtrasmart@gmail.com हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *