थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, २६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर

भरती परीक्षा पद्धती सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवारी छत्रपती संभाजीनगरला; विद्यार्थी, पालक व तज्ज्ञांशी साधणार संवाद

भंडारा, दि. २६ : खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यतूट व अन्य घटकांमुळे भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तीन तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाली असून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संबंधित तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा सवलती लागू करण्यात आल्या आहेत.

तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मागणीनुसार अधिकाधिक कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Trigger-1 लागू झालेल्या भंडारा, पवनी आणि लाखांदूर या तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबत पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्यात येणार आहे.

दरम्यान, संबंधित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *