थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, २३ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

लोकसंवाद मोहिमेअंतर्गत बीड शहरातील सावता गणेश मंडळ येथे उपक्रम

लोकसंवाद मोहिमेअंतर्गत बीड शहरातील सावता गणेश मंडळ येथे उपक्रम

बीड दि. 22 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या कालावधीत सर्वसामान्यांना घरपोच आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने लोकसंवाद मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यातही ‘श्रीगणेशा आरोग्याचा ” या संकल्पनेअंतर्गत सलग १० दिवस विविध शासकीय रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत खासगी वैद्यकीय संस्था तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. या अभियानांतर्गत शासकीय आणि खासगी वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने पुढील तपासण्या मोफत केल्या जात आहेत:

सामान्य शारीरिक तपासणी व औषधोपचार

रक्तदाब (BP) आणि मधुमेह (Sugar) तपासणी

कर्करोग (Cancer) प्राथमिक तपासणी

ईसीजी (ECG) व आवश्यक रक्तचाचण्या

असंसर्गजन्य आजारांचे (NCD) प्राथमिक निदान

 

गावोगावी आरोग्य यंत्रणा सज्ज

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरी आरोग्य केंद्रे तसेच ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या सर्व केंद्रांवर ही मोफत तपासणी सुरू आहे. यासोबतच गर्दीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे भरवण्यात येत असून मंडळांकडूनही याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

बीड जिल्ह्य अंतर्गत मा. जिल्हाधिकारी श्री विवेक जॉनसन , निवासी जिल्हाधिकारी श्री शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सतीश सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष बीड येथील डॉ चैतन्य कागदे यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळापर्यंत आरोग्याचा जागर पोहचवण्याचे नियोजन आखले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अहवाल – बीड जिल्हा

श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, बीड

दिनांक : १४  ते २१ /०९ /२०२६

शिबिरांचा आढावा

एकूण शिबिरे : ५५३

एकूण रुग्ण : २६१७१

एकूण पुरुष : ११७९५

एकूण महिला : १०९५८

बालके : ३४१८

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *