थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
बुधवार, २३ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. संजय कदम उपाध्यक्षपदी डॉ. राहुल कुलकर्णी

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

कार्यकारी समितीवर सहा सदस्यांची निवड

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या व नामनिर्देशित सदस्यांच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली.

या निवडणुकीत डॉ. संजय कदम यांची अध्यक्षपदी, तर डॉ. राहुल कुलकर्णी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यकारी समितीच्या सदस्यपदी डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. उज्वला कराड, डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, डॉ. सुनील इंगळे आणि डॉ. अनिलकुमार पाटील यांची निवड करण्यात आली.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, संयोजक अधिकारी तथा उपसचिव संदीप ढाकणे आणि निवडणूक निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.

निवडणूक प्रक्रियेसाठी प्रबंधक डॉ. रोकेश वाघमारे तथा उपप्रबंधक अमीर मुजावर उपस्थित होते.

00000
अश्विनी पुजारी/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *