थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मसकऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मसकऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

नागपूर, दि. ४ – नागपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मसकऱ्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नागपूरची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी एक हा गणेशोत्सव आहे. ही ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण परंपरा शेकडो वर्षांपासून भोसले घराण्याने अतिशय आदराने जपली आहे. हा गणेशोत्सव केवळ एक धार्मिक उत्सव नसून नागपूर शहराची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वैभवशाली सांस्कृतिक ओळख बनला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

महाल येथील सीनिअर भोसला पॅलेस येथे श्री महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या ऐतिहासिक ‘मसकऱ्या गणपती’च्या दर्शनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम),  राजे मुधोजी भोसले आणि राजे जयसिंह भोसले आदी उपस्थित होते.

​सीनिअर भोसला पॅलेस येथे आगमन होताच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणरायाचे दर्शन घेतले. याप्रसंगी नागपूरच्या भोसले घराण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

​आपल्या भाषणात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  नागपूरकर भोसले घराण्याचा इतिहास अत्यंत जाज्वल्य आणि देदीप्यमान राहिला असून, पूर्वेकडे हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्यात या घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. आजच्या काळातही सर्व ऐतिहासिक प्रथा आणि परंपरा मुधोजी राजे भोसले यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अतिशय उत्साहात पार पडत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

नागपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मसकऱ्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. मसकऱ्या गणपतीला ‘हडपक्या गणपती’ असेही म्हटले जाते. भाद्रपदातील सार्वजनिक गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्षात हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे हा उत्सव नागपूरच्या अन्य गणेशोत्सवांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.