थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन

लोकसंवाद-२०२६: सातारा येथे २९ सप्टेंबर रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा

मुंबई दि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. दीपा मुंडे-मुधोळ यांनी याबाबत राज्यातील अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सेवा, सामाजिक सहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जोडण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यांमध्ये ‘संवाद सेतू’च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. योजनांच्या लाभार्थ्यांचा सहभाग वाढवून शासनाच्या योजनांमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती संवादाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी, अनाथालय व वृद्धाश्रम भेटी, महिला आरोग्य व स्वच्छता, डिजिटल साक्षरता, दिव्यांगजन सहयोग तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विभागाचे अधिकारी व कर्मचारी शहरी तसेच ग्रामीण भागात नागरिकांशी थेट संवाद साधून जनजागृती करणार आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांच्या यशोगाथा, व्हिडीओ, रिल्स आणि लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया संकलित करून डिजिटल माध्यमातून व्यापक जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा आणि अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

000

अश्विनी पुजारी/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *