थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘लिपिक-टंकलेखक’ निवड होणाऱ्या उमेदवारास नोंदणी व मुद्रांक विभागाच्या राज्यभरातील रिक्त पदावर काम करण्याची संधी

सोलापूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान अंतर्गत सर्व विभागांनी नागरिकांना योजनांचा लाभ देऊन अभियान यशस्वी करावे -अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात क्रमांक 124/2025 नुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2025 तसेच जाहिरात क्रमांक 014/2026 अन्वये महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-2025 घेण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे गट-क संवर्गातील ‘लिपिक-टंकलेखक’ पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण राज्यातील या संवर्गाच्या रिक्त पदांवर करण्यात येणार आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना विभागांतर्गत राज्यातील कोणत्याही रिक्त पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल.

सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), उदयराज चव्हाण यांनी केले आहे.

०००००

बी.सी. झंवर/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.