
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या ऑगस्ट २०२६ या अंकाचे प्रकाशन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र चे सचिव तथा अतिथी संपादक सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक तथा वरिष्ठ सहायक संचालक (प्रकाशने) जगदीश मोरे, राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी संजय ओरके उपस्थित होते.
‘आपलं मंत्रालय’च्या या अंकामध्ये
विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) च्या माध्यमातून मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्याची प्रक्रिया, ‘महा ई-एचआरएमएस’च्या माध्यमातून प्रशासनाची डिजिटल वाटचाल, शेगाव दर्शन ते ज्ञानगंगा सफारी, परंपरेचा अभिमानास्पद वारसा, स्वच्छता, सेवानिवृत्तीनंतरचे जीवन, लॉकडाऊनमधील अनुभव, अवयवदान, करिअरच्या नव्या वाटा, रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता, ‘द मेटामॉर्फोसिस’, पक्षीनिरीक्षण, महाराष्ट्राचा पशुधन वारसा तसेच विविध साहित्यिक व सामाजिक विषयांचा समावेश आहे. या विविधांगी लेखांमधून आधुनिक तंत्रज्ञानासोबतच मानवी मूल्ये, लोकशाहीतील नागरिकांचा सहभाग, सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसंवर्धन यांचा समतोल साधणारा व्यापक दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.
मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गृहपत्रिका प्रकाशनाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
0000
शैलजा देशमुख/विसंअ

Leave a Reply