थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. १६ : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) अधिनियमांतर्गत पीडित बालकांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त करण्यात येणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील पदव्युत्तर पदवीधारक व्यक्ती या पदासाठी पात्र आहेत. तसेच बालशिक्षण व विकास किंवा बालसंरक्षण क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर आणि ‘एमएस-सीआयटी’ अथवा संगणक ज्ञानाचे अन्य प्रमाणपत्र असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. बालहक्क किंवा बालसंरक्षण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत संस्था, तसेच बालगृह अथवा निवारा गृहातील बालकांच्या देखरेखीशी संबंधित अधिकारीही ‘सपोर्ट पर्सन’ म्हणून पात्र ठरू शकतात.

पात्र उमेदवारांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा टप्पा, पहिला मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे अर्ज सादर करावा. अर्ज अथवा अधिक माहितीसाठी wcd_mumupanagar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल.

निवड झालेल्या ‘सपोर्ट पर्सन’ची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात येईल. त्यांना सोपविण्यात आलेली प्रकरणे, प्रत्यक्ष कामाचे दिवस तसेच रुग्णालय, बाल कल्याण समिती, पोलीस ठाणे, बालसंगोपन संस्था, पीडित बालकाचे कुटुंब, शैक्षणिक संस्था, न्यायालय, शासकीय विभाग आणि बँक आदी ठिकाणी दिलेल्या प्रत्यक्ष भेटींच्या प्रमाणात मानधन देण्यात येईल.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.