
नांदेड (जिमाका), दि. १९: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण आणि संभाव्य नुकसानाबाबत त्यांनी माहिती घेतली.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आस्थेने ऐकून घेत, ‘शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी असून, जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही मंत्री भरणे यांनी दिली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
००००

Leave a Reply