थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २९: ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियाना’अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी वडाळा येथे आयोजित विशेष महाराजस्व शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली तब्बल २८९ गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ तसेच दाखल्यांचे थेट वितरण करण्यात आले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर) आणि भटके विमुक्त विकास परिषद (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर २०२६ रोजी वडाळा पश्चिम येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित व उपेक्षित घटकांना शासकीय सेवांचा लाभ सुलभतेने मिळावा या उद्देशाने आयोजित शिबिरात विविध विभागांचे कक्ष उभारण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक १४८ नागरिकांना जात प्रमाणपत्रे, तर संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत ३४ लाभार्थ्यांना योजनांचे लाभ देण्यात आले. तसेच आयुष्यमान भारत (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) अंतर्गत ३०, निवडणूक विभागामार्फत २०, आधार कार्ड १७, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून १०, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ९, शिधावाटप विभागाकडून ९, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ७ आणि कामगार उपआयुक्त कार्यालयाकडून ५ लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे व सेवांचे वाटप करण्यात आले. याशिवाय उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन पुढील शासकीय प्रक्रियेसाठी आवश्यक ते मार्गदर्शनही करण्यात आले.

या शिबिराला अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, प्रादेशिक उपसंचालक (इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई विभाग) अमोल उगलमुगले, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, सहायक संचालक रविकिरण मलकुनाईक, तहसीलदार डॉ. मानसी मार्लेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

धोंडिराम अर्जुन/विसंअ

 

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.