थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबईत ‘सेवा संकल्प’ अभियानात स्वच्छता, आरोग्य सेवांना प्राधान्य

मुंबईत ‘सेवा संकल्प’ अभियानात स्वच्छता, आरोग्य सेवांना प्राधान्य

• स्वच्छता मोहिमेसह ७१ रुग्णांची आरोग्य तपासणी

मुंबई, दि. २२ : ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत मुंबई शहरात स्वच्छता मोहीम तसेच आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांना प्राधान्य देण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने चिराबाजार येथील शिबिरात ७१ रुग्णांची तपासणी केली.

‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली जे. एस. एस. रोडवरील झावबावाडी येथील डॉ. सूर्यकांत वगळ प्रसूतीगृह आणि एन. एस. रोडवरील के. जी. मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने या दोन्ही ठिकाणी सखोल स्वच्छता केली. तसेच नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याचे वर्गीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले.

चिराबाजारमधील गजदर स्ट्रीट येथील पारेख निवास येथे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग, मधुमेह आणि ॲनिमिया यासंदर्भात ७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

०००००

धोंडिराम अर्जुन/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *