थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  • मंत्रालयात १ ऑक्टोबरपर्यंत खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदीची संधी

 मुंबई, दि. २८ : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन आणि उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रदर्शनातील एका स्टॉलचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध ग्रामोद्योग उत्पादनांचा समावेश

या प्रदर्शनात मध संचालनालय, क्राफ्टी आर्च, माई महिला बचतगट, ब्युटी क्वीन बीज – गिफ्टेक्स इंडस्ट्रीज, जीन क्रिएशन, सई लेदर वर्क्स शॉप, कोल्हापूर, औद्योगिक व्यवसाय संस्था, मुंबई, कस्तुरबा सोलर खादी समिती, अमरावती, नागपुरे ड्रायफूड्स, जागृती हळद पावडर, फ्लोरिया नॅचरल्स, ग्लॅमरएक्स इम्पेक्स, निद्रा क्रिएशन, ठाणे आणि मॉर्डन लेदर आर्ट, माथेरान आदी संस्थांच्या उत्पादनांचा समावेश आहे.

प्रदर्शनात मध संचालनालयाचे ‘मधुबन मध’, खादी वस्त्रे, घरगुती पापड, लोणची, सौंदर्य प्रसाधने, हळद, विविध ड्रायफूडस, कोल्हापुरी चप्पल यांसह विविध खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. महिला बचतगट तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांनाही या प्रदर्शनातून बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

१ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हे प्रदर्शन १ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांनी या प्रदर्शनास भेट देऊन खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

गजानन पाटील/विसंअ

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.