थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

रायपूर येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर

रायपूर येथे ‘लोककलेतील श्रीगणेश’मधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जागर

रायपूर, दि. २४ : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव राज्याच्या सीमांपलीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘लोककलेतील श्रीगणेश’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रायपूर येथे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

बुधवार, २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मंडळ, जी. ई. रोड, चौबे कॉलनी, रायपूर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे सादरीकरण भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी केले. लोकनृत्य, पारंपरिक कला, संगीत आणि गणेशभक्तीच्या विविध कलाविष्कारांतून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन रसिकांना घडले. कार्यक्रमाला रायपूरमधील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच महाराष्ट्रप्रेमी रसिक उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये गणेशभक्तीला विशेष स्थान आहे. लोककलेच्या विविध माध्यमांतून महाराष्ट्रातील भक्ती, श्रद्धा, लोकजीवन आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. ‘लोककलेतील श्रीगणेश’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक वैभवाचा अनुभव रायपूरमधील रसिकांना घेता आला.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र मंडळ, रायपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय मधुकर काळे, उपाध्यक्ष गीता श्याम दलाल आणि सचिव चेतन दंडवते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र मंडळ, रायपूर हे गेल्या अनेक दशकांपासून रायपूरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे.

रायपूरचे खासदार अग्रवाल यांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा संदेश देत महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेच्या प्रसारासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख राज्याबाहेरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाला रायपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेबद्दलच्या रसिकांच्या आत्मीयतेचे द्योतक ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी महाराष्ट्र मंडळ, रायपूरचे पदाधिकारी, कलाकार आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले.

0000

संजय ओरके/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *