थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महा वाणिज्यदूतांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महा वाणिज्यदूतांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. १८ : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध देशांच्या महावाणिज्यदूतांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्व महा वाणिज्यदूतांचे स्वागत करून त्यांच्यासमवेत श्री. गणेशाची पूजा केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित महा वाणिज्यदूतांशी संवाद साधला. गणेशोत्सवाच्या उत्साही आणि मंगलमय वातावरणात झालेल्या या भेटीत विविध विषयांवर सौहार्दपूर्ण चर्चा झाली. महावाणिज्यदूतांनीही श्री गणेशाचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला.

महावाणिज्य दुतांमध्ये जपान येथील हितोमी सातो, व्हिएतनामचे ले क्वांग बिएन, दक्षिण कोरियाचे डोंगवान यू, युएइचे अब्दुल्ला हुसेन अलमर्झुकी, ओमान देशाचे महबूब अल रईसी, इटलीच्या वॉल्टर फेरारा, तुर्कीयेचे मुस्तफा केमालेत्तिन एरुयगुर, येमेन देशाचे मोहम्मद ताहेर अब्दुलमोघ्नी, कतारच्या अहमद साद अल-सुलैती, थायलंडचे सिरीपोर्न सुपानी मत्विसेटकुल, फ्रान्सचे पॅट्रिक लेव्हेरीनो, पोलंड देशाचे तोमाश व्हिएल्गोमास, जर्मनीच्या ख्रिस्टॉफ हॅलियर, युक्रेनचे मिस ॲना झायचेन्को, आयर्लंड देशाचे पैट्रिक डफी, ब्राझीलचे रेल्सा पेलुती अलेंकार, इजिप्त देशाचे डालिया तवाकोल, चीन देशाच्या चिन जी, नेदरलँडचे नाबिल ताउती, इराणचे सईद रझा मोसायेब मोत्लाघ, स्वीडनचे स्वेन ऑस्टबर्ग, नॉर्वे येथील मॉनिका नागेलगार्ड, श्रीलंकेच्या शिरानी अरियाराथ्ने, मलेशियाच्या नजवा मुस्यरीफाह रामली, इराकचे जुहैर साद अब्बास, बेल्जियमचे पियरे स्टीव्हर्लिंक यांचा समावेश होता.

बांग्लादेशाच्या उप उच्चायुक्त फरहाना अहमद चौधरी, ब्रिटनच्या उप उच्चायुक्त कमलजीत कांग यांच्यासह अमेरिकेच्या उप महावाणिज्यदूत एरिन युसेन यांची उपस्थिती होती. तसेच फिनलंड येथील उप महावाणिज्यदूत जोन्ना सुनि उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अमृता फडणवीस आदी उपस्थित होते.

00000

नीलेश तायडे/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.