थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

विद्यार्थ्यांच्या हितासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश सुरू करा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या– जालना पालकमंत्री पंकजा मुंडे

व्यवस्थापन कोटा शुल्काबाबत तीन दिवसांत स्पष्टता मागविण्याचे निर्देश

मुंबई, दि. २२ : पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासकीय आणि खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांची केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी. व्यवस्थापन कोट्याच्या शुल्काबाबत शुल्क नियामक प्राधिकरणाकडून स्पष्टता मिळेपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवू नये, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, खासगी महाविद्यालयांतील विद्यापीठ कोट्यासाठीचे मूळ शुल्क निश्चित आहे. या शुल्काचा उल्लेख करून माहितीपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी आणि विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवावेत. शुल्क नियामक प्राधिकरण व्यवस्थापन कोट्याचे अंतिम शुल्क निश्चित करेल. प्राधिकरणाचा निर्णय सर्व संबंधित महाविद्यालयांना लागू राहील, अशी स्पष्ट नोंद माहितीपत्रिकेत करावी. तसेच, प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे पत्रात नमूद करून प्राधिकरणाकडून तीन दिवसांत उत्तर मागवावे, असे निर्देशही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

यावेळी आमदार विनय कोरे, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील, सहसचिव नि. भा. मराळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

०००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *