थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुंबई उपनगरात २६ ठिकाणी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’चे आयोजन – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

मुंबई उपनगरात २६ ठिकाणी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’चे आयोजन – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. २७ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी अंधेरी, कुर्ला, बोरिवली व वांद्रे येथे २६ विविध ठिकाणी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’चे आयोजन केले आहे. रोजगार इच्छुक युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या या रोजगार मेळाव्यांमध्ये उत्पादन, अभियांत्रिकी, बँकिंग व वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, सेवा तसेच वाहतूक व लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रोजगार मेळाव्यात अधिकाधिक युवकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उमेदवार नोंदणी आणि रोजगार मेळावा मार्गदर्शन यावर विशेष भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रोजगार इच्छुक युवक-युवतींना रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 ही लिंक आहे. रोजगार मेळावा सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे.

मुंबईतील विविध भागांतील शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), विद्यापीठे आणि उद्योग क्षेत्रातील संस्थांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विविध संस्थांची नोंद करण्यात आली आहे. बोरिवली, कुर्ला आणि अंधेरी या भागांतील संस्थांचा यामध्ये समावेश आहे.

बोरिवली भागातील लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), क्वास्टेक, झगडू सिंग चॅरिटेबल ट्रस्टचे ठाकूर स्पेशलाइज्ड डिग्री कॉलेज आणि विवेक कॉलेज ऑफ कॉमर्स, गोरेगाव या संस्थांचा समावेश आहे.

कुर्ला भागातील AICMEU’s खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मानखुर्द, नवजीवन पॉलिटेक्निक, सोबती फाऊंडेशन मुंबई, अॅटलस स्किलटेक युनिव्हर्सिटी, के. जे. सोमय्या पॉलिटेक्निक, श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालय, घाटकोपर, अण्णा लीला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स व शोभा जयाराम शेट्टी कॉलेज फॉर बीएमएस, लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विनायक गणेश वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स आणि मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या संस्थांचा समावेश आहे.

अंधेरी भागातील नव समाज मंडळ महाविद्यालय, सॅपिओ अॅनालिटिक्स, असॉर्ट १ कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेतना कॉलेज, फादर ॲग्नेल कॉलेज वांद्रे, युवा प्रतिष्ठान खेरवाडी-वांद्रे, शासकीय पॉलिटेक्निक मुंबई, एम. एल. डहाणुकर कॉलेज ऑफ कॉमर्स, भवन्स कॉलेज आणि साठ्ये कॉलेज विलेपार्ले या संस्थांचा समावेश आहे. या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सहायक आयुक्त, कौशल्य विकास मुंबई उपनगर शैलेश भगत (मोबाईल क्रमांक ७७१९८२६२६०), जिल्हा समन्वयक विलेश संखे (मोबाईल क्रमांक ९८६९१७४०६६), नोडल अधिकारी (मोबाईल क्रमांक ८४२१५७५०५१) यांनी केले आहे.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.