थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध होणार

शेतात गोगलगाईंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करा; कृषी विभागाचे आवाहन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  • शासनाकडून ५५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. १: आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत, स्त्री शिक्षणाचे प्रणेते तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे युगपुरुष महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणे व टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे या उपक्रमास गती मिळाली असून, सांस्कृतिक कार्य विभागाने यासंबंधीच्या ५५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे.

महात्मा जोतिराव फुले यांनी सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांची पायाभरणी करून भारतीय समाजजीवनाला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि त्यांच्या राष्ट्रीय योगदानाचे स्मरण व्हावे, या उद्देशाने द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त स्मृती नाणे व टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महात्मा जोतिराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा गौरव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करणारा हा निर्णय ठरला असून, मंत्री अतुल सावे यांच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

000

धोंडिराम अर्जुन/विसंअ

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.