थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २१ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मुंबईतील मनपा शाळांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम

मुंबई, दि. २१: मुंबई शहर जिल्ह्यामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत घोघारी मोहल्ला, मस्जिद स्ट्रीट येथील अब्दुल कादिर हाफिजका मनपा उर्दू शाळा तसेच कुंभारवाडा येथील गुलालवाडी मनपा हिंदी शाळेत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या निर्देशानुसार या मोहिमेचे नियोजन करण्यात आले.

‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दोन्ही शाळांमध्ये स्वच्छता करण्यात आली. तसेच शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेत विद्यार्थ्यांनीही परिसर स्वच्छ राखण्याचा संदेश आत्मसात केला.

स्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचा संकल्प

सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच स्वच्छ शाळा, सुंदर परिसर आणि कचऱ्याचे योग्य वर्गीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला.

0000

धोंडिराम अर्जुन/विसंअ

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *